आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कर्जोदनजीक दोन सख्खे भाऊ ठार ; खंडवा जिल्ह्यातील रहिवासी

वाघोड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार झाले. असून हा अपघात सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील कर्जोद गावाजवळ बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर झाला. सुनिल नारायण हरिजन (वय ३५) आणि अनिल नारायण हरिजन ( वय २३) अशी या अपघातात ठार झालेल्या भावांची नावे आहेत. हे दोघ भाऊ मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पानझिरिया गावचे रहिवासी आहेत. ते काही दिवसांपासून कर्जोद (ता. रावेर) फाट्यावर उघड्या जागेवर झोपडी करून राहत होते. त्यांच्यासोबत वृद्ध आई-वडील व एक चिमुकल्या मुलासोबत राहुन मिळेल ती मोलमजुरी करून आपला चरित्रार्थ चालवत होते. सोमवारी दुपारी ते रावेर येथून कर्जोदला मोटरसायकलीने येत होते. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहीती मिळताच रावेर पोलिस घटनास्थळी आले.

बातम्या आणखी आहेत...