आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कुऱ्हेपानाचे येथे दोन गटात‎ तुंबळ हाणामारी; 7 जखमी‎

कुऱ्हेपानाचे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे‎ गावात क्रिकेटचा बॉल लागल्याच्या‎ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी‎ झाली. या घटनेत दोन्ही गटातील ७ जण‎ जखमी झाले आहेत. या प्रकरणी‎ भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल‎ करण्यात आला.‎ पहिल्या गटातर्फे सविता संतोष पारधी‎ (२५, कुऱ्हेपानाचे) यांच्या फिर्यादीनुसार‎ संशयित श्वेता हर्षल दोडके, हर्षल‎ प्रकाश दोडके (दोन्ही रा.कुऱ्हे पानाचे),‎ हर्षल संतोष पाटील, ऋषिकेश संतोष‎ पाटील (दोन्ही रा.निंभोल, ता.बऱ्हाणपूर)‎ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात‎ आला.

तक्रारदार यांचा मुलगा क्रिकेट‎ खेळत असताना चेंडू श्वेता यांना‎ लागल्याने संशयितांनी वाद वाढवत‎ तक्रारदारासह त्यांची बहिण रेखाबाई‎ ज्ञानेश्वर पारधी, मेहुणे ज्ञानेश्वर सीताराम‎ पारधी, भाऊ मंगल नथ्थू पारधी (रा.कुऱ्हे‎ पानाचे) यांना मारहाण व शिविगाळ‎ केली. दुसऱ्या गटातर्फे हर्षल प्रकाश‎ दोडके (३३, इंदिरा नगर, भुसावळ) यांनी‎ तक्रार दिली.

त्यात मंगल नथ्थू पारधी,‎ सविता संतोष पारधी, ज्ञानेश्वर सीताराम‎ पारधी, रेखाबाई ज्ञानेश्वर पारधी (सर्व‎ रा.कुऱ्हेपानाचे) यांच्याविरोधात गुन्हा‎ दाखल झाला. चेंडू लागल्याच्या‎ कारणावरून संशयितांनी फिर्यादीसह‎ त्यांची पत्नीला शिविगाळ केली. सासूच्या‎ डोक्यावर काठी मारून दुखापत केली.‎ गुन्ह्याचा तपास भुसावळ तालुका पोलिस‎ ठाण्यातील पोलिस नाईक दीपक जाधव‎ करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...