आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भुसावळमध्ये रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांना 2.40 लाख रुपयांची लाच घेताना अटक

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंडळ अभियंत्यांसह कार्यालयीन अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात

रेल्वे बांधकामाचे अडीच कोटी रुपयांचे काम ई-निविदेतून मिळाल्यानंतरही वर्क ऑर्डरसाठी २ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना रेल्वेचे मंडळ अभियंता एम. एल. गुप्ता व कार्यालयीन अधीक्षक संजीव रडे यांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी डीआरएम कार्यालयात ही कारवाई झाली. रात्री उशिरापर्यंत दोघांच्या निवासस्थानी सीबीआयच्या १८ जणांच्या पथकाकडून झाडाझडती सुरू होती. मलकापूर (जि. बुलडाणा) येथील बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून रेल्वेचे कामे केली जातात. या कंपनीने सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कन्स्ट्रक्शन कामासाठी निविदा भरली होती.

या कंपनीचे निविदा दर कमी होते. यामुळे या कंपनीला वर्क ऑर्डर देणे अपेक्षित होते. मात्र वर्क ऑर्डर देण्यासाठी मंडळ अभियंता एम. एल. गुप्ता यांनी चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यातील २ लाख वर्क ऑर्डर देण्यापूर्वी व २ लाख बिलिंग झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. यासोबतच बांधकाम अभियांत्रिकी विभागाचे कार्यालयीन अधीक्षक संजीव रडे यांनी २.२५% रक्कम वेगळी मागितली होती. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांनी सीबीआयकडे तक्रार केली होती.

या तक्रारीवरून नागपूर, पुणे व मुंबई येथील संयुक्त पथकाने सापळा रचून सोमवारी डीआरएम कार्यालयात मंडळ अभियंता गुप्ता यांना दोन लाख रुपये रोकड स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर संजीव रडे यांना ४० हजार रुपयांची रोकड घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. गुप्ता यांचे रेल्वेच्या ऑफिसर क्लबमधील आरबी-४/ १५५ या तर संजीव रडे यांचे जामनेर रोडवरील श्री स्वामी समर्थ कॉलनीतील घरी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...