आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वरखेड खुर्दजवळ कारच्या धडकेत भोकरदनचे दोन तरुण गंभीर जखमी

बोदवड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड ते मलकापूर रस्त्यावरील वरखेड खुर्द गावाजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले. हा अपघात सकाळी ११ वाजेच्या सुमारास झाला.भोकरदन तालुक्यातील रोहन केशव भोंबे (वय२८) व सोमनाथ भोंबे (वय २०) हे एमएच.२०- सीजी.५८७३ क्रमांकाच्या दुचाकीने बोदवडकडे येत होते. यावेळी मलकापूरकडे जाणाऱ्या कारने (क्रमांक एमएच.१२-इटी.२८७७) त्यांना समोरून धडक दिली.

ही माहिती शिवसैनिकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना कळवली. आमदारांनी बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यांना सूचना करून जखमींना मदतीची सूचना केली. नगराध्यक्ष पाटील यांनी गोलू बरडिया, हर्षल बडगुजर, कलीम शेख यांना सोबत घेऊन पालिकेच्या रुग्णवाहिकेने बोदवड ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथून शिवसैनिकांनी जखमींच्या नातेवाइकांसोबत संपर्क साधला. त्यांच्या सूचनेवरून जखमींना बुलडाणा येथे नातेवाईकांकडे पोहोचवले. जखमींपैकी रोहन भोंबे याच्यावर बुलडाणा, तर सोमनाथ भोंबे यांच्यावर औरंगाबादला उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बोदवड पोलिसांत कोणतीही नोंद नाही.

बातम्या आणखी आहेत...