आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश काशिनाथ पाटील यांची गुरुवारी बिनविराेध निवड झाली. लोकनियुक्त सरपंच वंदना दीपक भोलाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. दुपारी १२ वाजेपर्यंत असलेल्या मुदतीत प्रकाश पाटील यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी सुनील धनगर, पंचफुला बेलदार, सविता धनगे, बसनबाई हिवरे, गणेश अमलदार, वैशाली पाटील, शोभा भोलाणे, किरण तायडे, प्रतिज्ञा इंगळे, सविता इंगळे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक एकनाथ कोळी व निरीक्षक एस.पी. मोरे यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. ग्रामपंचायतीच्या सर्व ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी गुरुवारी उपसरपंच निवडीवेळी पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी उपस्थित राहून सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला. याप्रसंगी रामभाऊ पाटील, साहेबराव पाटील, जितेंद्र पाटील, साहेबराव शिंगतकर, शांताराम धनगर, विश्वनाथ बगाडे, आत्माराम पाटील, रमेश भोलाणे, दयाराम पाटील, प्रवीण पाटील, गणेश धनगर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.