आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कर्की फाट्यावर उज्जैन-शेगाव बस उलटून वाहक ठार;15 प्रवासी जखमी, जखमींमध्ये महिला, मुलांचा समावेश, बसचा चालक झाला पसार

मुक्ताईनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-इंदू आंतर राज्य महामार्गावर मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्यावर उज्जैन-शेगाव बसच्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस उलटून अपघात झाला. या अपघातात बसचा वाहक जागीच ठार झाला असून १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथून शेगावला जाणारी मध्य प्रदेश परिवहन मंडळाची एमपी १३ पी १३४३ या क्रमांकाची बस सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कर्की फाट्याजवळून जात होती. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस थेट शेतात जाऊन उलटली. या अपघातात वाहक हा जागीच ठार झाला असून बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमधील प्रवाशांच्या माहितीनुसार बस ही कर्की फाट्यावर आली असताना समोरून ओम्नी गाडी येत होती. याचवेळी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

या अपघातात विनोद चिंतामण गुजर (वय ३५), रा.ओशिया, ता.आगर मालवा (मध्य प्रदेश) याचा मृत्यू झाला. तीन जखमींना जळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या अपघातात शेख फैजान शेख मजीद (वय ७), रा.मलकापूर, अॅड.शेख मजीद (वय ४०), मलकापूर, शबाना शेख वसीम (वय २२), रा. सावदा, मेहेक शेख तालीम (वय २२), शेख निसार (वय ४५) तनेका कैसर (वय ८), हंसराज भगवानसिंग परदेशी (वय ५३), रा. मलकापूर, शेषराव तानाजी तायडे (वय ११), रा.भोर, ता.नांदुरा, पुष्पा संजय गायकवाड (वय ५९), रा. खामगाव, पद्माबाई देविदास सूर्यवंशी (वय ५५), रा.खामगाव, सय्यद अकबर सय्यद वजीर (वय ४३), रा. मलकापूर हे जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...