आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध योजनांची माहिती:हरताळे येथे उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य कार्यक्रम

अंतुर्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊर्जा मंत्रालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ हा कार्यक्रम हरताळे (ता.मुक्ताईनगर) येथे पार पडला. त्यात खासदार रक्षा खडसे यांनी केंद्र सरकार सन २०१४ पासून राबवत असलेले विद्युतीकरण व उर्जा विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

उर्जा मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम देशात एकाचवेळी आयोजित केला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉंन्फरन्सद्वारे संवाद साधला. खासदार खडसेंनी हरताळे येथील नागरिकांना योजनांची माहिती दिली. महावितरणच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या ५ ग्राहकांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार श्वेता संचेती, महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे संजीवकुमार बंजरे, हरताळे सरपंच प्रकाश कोळी, जयेश कार्ले, ईश्वर रहाणे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...