आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय अधिकारी, कर्मचारी स्वच्छतेबाबत जनतेला धडे देतात. मात्र, भुसावळ शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ अशी स्थिती आहे. कारण, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केंद्राचे पथक लवकरच शहरात येणार आहे. त्यांच्याकडून शहर स्वच्छतेची परीक्षा घेण्यात येईल. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छतेने कहर केला आहे.
‘दिव्य मराठी’ने प्रांताधिकारी, तहसील, पंचायत समिती, पालिका, भूमीअभिलेख कार्यालयात पाहणी केल्यावर हे चित्र समोर आले. दरम्यान, प्रांत कार्यालयात दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावर सर्वत्र जाळे पसरले हाेते. प्रशासकीय इमारतीच्या आवारात अस्वच्छता हाेती. मोकाट कुत्र्यांचा तेथे मुक्तसंचार दिसला. मुख्य कार्यालयाच्याबाजूकडील परिसर चकाचक तर इतरत्र अस्वच्छता दिसत हाेती. स्वच्छ सर्वेक्षण होण्यापूर्वी बदल अपेक्षित आहे.
सामूहिक जबाबदारी, सर्वांनी पुढे यावे
शहरातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी त्या-त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शहर असो वा कार्यालय तेथे स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. पालिकेच्या पातळीवर योग्य खबरदारी घेण्यात येईल. -संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, भुसावळ
पंचायत समितीत कचऱ्याचे ढीग पडून
पंचायत समितीत बीडीओंच्या दालनाच्या बाहेर फरशा तुटल्या आहे.मिटींग हॉलकडील मार्गावर अस्वच्छता हाेती. याच आवारात तीन ठिकाणी झाडांच्या खाली पडलेल्या पानांना गोळा करून ठेवले होते. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला अस्वच्छता हाेती. संपूर्ण तालुक्याला स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या पं.स.मध्येच स्वच्छता अभियानाची गरज समोर आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.