आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाचे रुग्ण वाढते असल्याने आरोग्य यंत्रणेने लसीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी शहरात १ जूनपासून १६ पथकांमधील ४८ कर्मचारी हर घर दस्तक अभियान राबवत आहेत. त्यात आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले.
भुसावळ शहरात जिल्हा आरोग्य विभागाने १८ प्लस वयोगटातील १ लाख ५८ हजार ८६८ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ८८ टक्के लसीकरण झाले, उर्वरित सर्वांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभाग १ जूनपासून हर घर दस्तक अभियान राबवत आहे. ४८ आरोग्य कर्मचारी प्रत्येक वॉर्डात घरोघरी जावून माहिती घेत आहे. त्यांनी १३ दिवसांत एक हजार लसीकरण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.