आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:वड्री धरण, आसारबारीत भोंगऱ्या बाजार‎

यावल‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वड्री धरण व‎ आसारबारी येथे भोंगऱ्या बाजार‎ उत्साहात साजरा करण्यात आला. या‎ ठिकाणी प्रथमच भोंगऱ्या बाजाराचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ वड्री धरण व आसारबारी येथे गेल्या‎ ३५ वर्षांपासून आदिवासी बांधव‎ वास्तव्यास आहेत. त्यामुळे भोंगऱ्या‎ बाजार भरवण्यात यावा म्हणुन‎ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया‎ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू‎ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली,‎ तालुकाध्यक्ष विष्णू पारधे यांनी वड्री‎ सरपंच अजय भालेराव व ग्रामपंचायत‎ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

त्यानंतर‎ येथे भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भोंगऱ्या बाजाराचे उद्घाटन‎ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‎ पारंपारिक वाद्यांच्या गजरात‎ आदिवासी पावरा बांधवांनी भोंगऱ्या‎ बाजाराचा अानंद लुटला. निवृत्त‎ सैनिक सुनील तायडे, विष्णू पारधे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बाबुलाल पटेल, श्रीकांत वानखेडे,‎ विक्रम प्रधान, सुपडू संदानशिव,‎ डॉली वानखेडे, राजू इंगळे, राजू‎ वानखेडे, शिवाजी गजरे, किरण‎ तायडे, प्रवीण सावळे यांच्यासह‎ आदिवासी बांधव उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...