आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल केला जप्त:वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा; १९ जुगारींना केली अटक

वरणगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्पर पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार वरणगाव पोलिसांनी टहाकळी शिवारात छापा टाकला. त्यात १९ जुगारींवर कारवाई करत त्यांचेकडून १ लाख ५६ हजाराची रक्कम जप्त केली.गणेशोत्सवासाठी आयोजित शांतता समितीच्या बैठकीला मुक्ताईनगर कडून वरणगाव येथे आलेले अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना टहाकळी-चिंचोल मार्गावरील हॉटेल स्वप्नपूर्णाचे मागे जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरणगाव येथील बैठक आटोपताच एपीआय आशिष अडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वरणगाव पोलिसांनी वरील ठिकाणी सायंकाळी ६ वाजता छापा टाकला. त्यात १९ जुगारी आढळले. दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी १७ जुगारींकडून १ लाख ५६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

कारवाई झालेल्यांमध्ये शेख अन्वर शेख अकबर, शेख नईम शेख रहेमान, नितीन निवृत्ती माळी, महेंद्र कडू वंजारी (सर्व रा.वरणगाव), संजय विश्वनाथ पाटील, प्रवीण दगडू पाटील (रा.वढवे ता.मुक्ताईनगर), संजय श्रीराम चौधरी, विकास नारायण चौधरी, मनोहर देवराम पाटील, अमोल काशीनाथ पाटील (रा.चिंचोल ता.मुक्ताईनगर), राजेश जगदीश पाटील (रा.काहुरखेडे), गौरव अनिल तळेले, वैभव अशोक पाटील (रा.मुक्ताईनगर), सचिन सोपान इंगळे (रा.हरताळे), गोपाळ रघुनाथ तायडे, देविदास भीमराव सपकाळे (रा.मानपूर), पद्माकर गोपाळ पाटील (रा.सुसरी) यांचा समावेश आहे. तर समाधान बाजीराव पाटील व वसंत भलभले हे दोन जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिस चेतन प्रभाकर निकम यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...