आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद:विद्यापीठात विज्ञान दिनी‎ विविध स्पर्धा रंगल्या‎

जळगाव‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र‎ प्रशाळेत विज्ञान दिनानिमित्त विविध‎ स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी,‎ पोस्टर, प्रश्नमंजुषा, लोगो आदी‎ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला.‎ परीक्षक म्हणून प्रा. किर्ती कमलजा,‎ डॉ. मनीषा इंदाणी, प्रा.नवीन दंदी‎ यांनी काम पाहिले. या वेळी‎ अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांचे‎ व्याख्यानही झाले. या वेळी संचालक‎ प्रा. डी. एच. मोरे, प्रा. पी. पी.‎ माहुलीकर, प्रा. रत्नमाला बेंद्रे, डॉ.‎ विकास गिते उपस्थित होते.‎ समन्वयक म्हणून डॉ. अमरदिप‎ पाटील व पवन बाविस्कर यांनी काम‎ पाहिले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.‎ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...