आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसंवाद यात्रेचा शुभारंभ:जनसंवाद यात्रेत मांडल्या नागरिकांनी विविध समस्या

मुक्ताईनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणी खडसे - खेवलकर यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. १६ ऑगस्ट रोजी या जनसंवाद यात्रेचा दुसरा दिवस होता. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावांमध्ये ही यात्रा पोहचणार आहे. स्वातंत्र्यदिनी बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. मुसळधार पावसातही कार्यकर्ते व गावकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसला नाही. त्यांनी विविध समस्या मांडल्या.

जुनोना, सोनाटी, अमदगाव, हिंगणे असा प्रवास केला. लोकांनी घरकुल, मनरेगा विहिरींचे न मिळलेल अनुदान, विधवा महिला, वृद्धांचे पगार, व्यायामशाळा, क्रीडांगण, सभागृह अशा समस्या मांडल्या. अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक गावात सेल्फी काढण्यासाठी आग्रह केला. यात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदिप पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, बोदवड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...