आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक दशकांपासून वारकरी सेवेत रुजू असलेले फैजपूर येथील नरेंद्र नारखेडे आणि बोदवड तालुक्यातील निमखेड येथील तुकाराम महाराज सुरंगे यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनुक्रमे ‘मुक्ताई वारकरी भूषण’ आणि ‘मुक्ताई वारकरी रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताईंच्या समाधिस्थळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दोघांचा झालेला भावपूर्ण सन्मान आगळावेगळा ठरला.
मुक्ताईनगर येथे पंढरपूर येथील श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा समिती आणि श्री संत मुक्ताबाई संस्था मुक्ताईनगर समाधिस्थळी यांच्या पुढाकाराने आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थान, जुने मंदिर समाधिस्थळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व निरूपण महोत्सव २८ डिसेंबरपासून सुरू आहे. त्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र नारखेडे यांना मुक्ताई वारकरी भूषण पुरस्कार देण्यात आला. चिनावल येथील वै. डिगंबर महाराज मठाच्या माध्यमातून नारखेडे हे वारकरी संप्रदायात कार्यरत आहेत. तर निमखेड येथील तुकाराम महाराज सुरंगे यांना मुक्ताई वारकरी रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप मानपत्र, पंचवस्त्र, ११ हजार रुपये रोख असे आहे. चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर, माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, अध्यक्ष रवींद्र पाटील, अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, रवींद्र हरणे महाराज, उद्धव महाराज जुनारे, निवृत्ती पाटील, यू.डी.पाटील यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.