आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथंडीमुळे भाजीपाल्याची आवक वाढून दर निम्म्याने कमी झाले आहेत. गेल्या पंधरवड्यात ८० ते १०० रुपये किलो असलेला भाजीपाला आता ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळतो. विशेषत: २०० रुपये किलोपर्यंत गेलेली कोथिंबीर आता ४० ते ५० रुपये किलो, तर मेथी, पालक या पालेभाज्या ८० ते १०० रुपयांवरून थेट ४० ते ५० रुपये किलोपर्यंत घसरल्या आहेत.
गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादनाला फटका बसला. यामुळे आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले होते. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. मात्र, थंडीचे प्रमाण वाढताच भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. यामुळे आवक वाढली. परिणामी भाजीपाल्याचे दर पुन्हा एकदा आवाक्यात आले आहेत.
गाजर, मटर शेंगांची अद्यापही प्रतीक्षा
थंडीच्या मोसमात शेवगा, गाजर, मटर शेंगांची बाजारात आवक वाढते. मात्र अद्याप बाजारात मटरशेंगाची आवक झाली नाही. त्यांचे दर सध्या १२० रुपये किलो आहेत. हायब्रीड गाजर ५० ते ६० रुपये किलो आहेत. आवक वाढल्यानंतर हे दर निम्म्याने कमी होतील. शेवगा शेंगांची आवक नाही. आवक होताच त्या ५० ते ६० रुपये किलोपर्यंत असतील.
किमान महिनाभर ही स्थिती कायम राहील, आवक वाढल्यास दर पुन्हा पडतील
हिवाळ्यामध्ये दरवर्षी आवक वाढली की दर कमी होतात. किमान महिनाभर ही स्थिती कायम राहू शकते. गेला महिना, पंधरवड्याच्या तुलनेत सध्याचे दर निम्म्याने कमी झाले. आवक वाढल्यास हे दर पुन्हा कमी होतील किंवा आवक घटली तर वाढतील. - उमेश चौधरी, व्यापारी, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.