आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवंदना‎:मोठे वाघोदा येथे शौर्य दिनी तरुणांसह‎ ग्रामस्थांनी दिली शहिदांना मानवंदना‎

मोठे वाघोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोठे वाघोदा‎ मोठा वाघोदा (ता.रावेर) येथील‎ रमाई नगरमध्ये डॉ.बाबासाहेब ‎आंबेडकर सार्वजनिक जयंती‎ उत्सव समितीतर्फे शौर्य दिन साजरा ‎ ‎ झाला.‎ कार्यक्रमाची सुरुवात कोरेगाव‎ भीमा येथील विजयस्तंभाच्या ‎पार्श्वभूमीवर उभारलेल्या राष्ट्रीय‎ ध्वज रंगी प्रतिकृती स्तंभास‎ मानवंदना देऊन व क्रांतीसूर्य महात्मा ‎ ‎ ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस ‎अभिवादनाने झाली. राष्ट्रीय‎ एकतेचा संदेश देण्यात आला.‎

कोरेगाव भीमा युद्ध हे स्वराज्य‎ संपवून त्याजागी निरंकुश शासन‎ स्थापन करू पाहणाऱ्या‎ व्यवस्थेविरुद्ध होते. सामान्य जनतेने‎ अस्मितेसाठी लढलेले युद्ध होते,‎ असे विकास सुरवाडे व अंकुश मेढे‎ यांनी सांगितले. सूत्रसंचालन महेंद्र‎ वाघ यांनी केले. प्रास्ताविक माजी‎ सरपंच राजेंद्र सावळे, तर दीपक‎ मुळे यांनी आभार मानले. रमाई‎ नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ नगर, एकता संघर्ष मंडळाने‎ सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...