आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:बाेदवड येथे ध्वज संहितेचे उल्लंघन; शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आरोप

बोदवड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्वजाराेहणावेळी भारतीय ध्वज संहितेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून उल्लंघन झाल्याचा आराेप शिवसेना नगरसेवकांनी केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येथील तहसीलदारांच्या दालनात तब्बल चार तास आंदाेलन केले. अखेरीस या प्रकरणी चाैकशी करून याेग्य त्या कारवाईचे आश्वासन तहसीलदार श्वेता संचेती यांनी दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.

येथील तहसील कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून १०० फूट उंच ध्वज स्तंभ उभारण्यात आला असून स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी तहसील कार्यालयाकडून ९.३५ वाजेची वेळ ठरवली हाेती. आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर येथील तिरंगा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित हाेते. त्यांच्या वतीने संगांयाे समिती अध्यक्ष डॉ.उद्धव पाटील हे येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण करणार होते. परंतु ९ वाजेच्या सुमारास आमदार खडसे तहसील कार्यालयात आले. तेथील शासकीय ध्वजारोहण नऊ वाजून पाच मिनिटांनी झाले.

त्यानंतर खडसे यांनी कार्यकर्त्यांसह तहसील विशाल ध्वजाच्या ठिकाणी जावून ध्वजाराेहण केले. यावेळी राष्ट्रध्वजास कोणत्याही प्रकारची मानवंदना, सलामी न देता, उपस्थित विद्यार्थ्यांच्या रांगा न लावता तसेच ध्वज स्तंभ परिसरात गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रगीत सुरू झाले. लगेचच ध्वजारोहण करण्यात आले. सर्वत्र ९.३५ ची वेळ असताना येथे ९.१० ते ९.२० या वेळेत ध्वजारोहण झाले. शिवसेना नगराध्यक्ष, नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रध्वज संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची व चाैकशीची मागणी करत नगराध्यक्ष आनंदा पाटील व नगरसेवकांनी तहसीलदारांच्या दालनात गर्दी करत आंदोलन करू असे तहसीलदार श्वेता संचेतींना सांगितले. यावर संचेतींनी या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पत्र नगराध्यक्ष पाटील यांना दिले.

नागरिकांच्या आनंदावर विरजण, चाैकशीकडे लक्ष
या सर्व घडामोडीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी उपस्थित नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. यावेळी नगराध्यक्ष पाटील यांच्यासह बागवान, विजय बडगुजर, दिलीप गंगतीरे, सुनील बोरसे, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर, डॉ.उद्धव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या घटनेच्या चाैकशीकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...