आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वाहतुकीचे नियम मोडण्यात परवाना नसणे, सिटबेल्ट न लावणारे सर्वाधिक

भुसावळ5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी ते आॅक्टाेबर या केवळ १० महिन्यांच्या काळात तब्बल ३९ हजार ४१० भुसावळकरांनी वाहतुकीचे नियम मोडले. यापोटी शहर वाहतूक शाखेने १ कोटी १० लाख ५१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यात विनापरवाना वाहन चालवणे, सीटबेल्ट नसणारे सर्वाधिक आहेत. विना क्रमांकाचे वाहन चालवणारे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या ७१ हजार ४६३ इतकी हाेती. यंदा वर्ष संपण्यास अजून दीड महिन्याचा अवकाश असला तरी जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यात‎ वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या ३९ हजार ४१० आहे. त्यात वेग मर्यादेचा‎ भंग करणाऱ्यांची संख्या केवळ ४६ असली तरी विनापरवाना वाहन चालवणे‎ या सबबीखाली सर्वाधिक ७ हजार ६२ वाहन चालकांवर ३७ लाख ७१ हजार‎ रुपये दंडाची कारवाई झाली.

या खालोखाल ४,३४२ कारवाया सीटबेल्ट न‎ लावणे, तर तिसऱ्या क्रमांकावर विना क्रमांकाचे वाहन चालवण्याची प्रकरणे‎ २,३६० आहेत. या प्रकरणांमध्ये १२ लाख ८१ हजारांचा दंड करण्यात आला.‎ शहरात मोबाइलवर बोलताना गाडी चालवणाऱ्यांची संख्या अधिक आहेत.‎ अंतर्गत रस्त्यांवर केवळ मोबाइलवर बोलत गाडी चालवल्याने किरकोळ‎ अपघात होतात. १० महिन्यांत वाहतूक शाखेने अशा १११ जणांवर कारवाई‎ करुन १ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.‎

गेल्या वर्षीची स्थिती...गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात भुसावळ शहर वाहतूक शाखेने ७१ हजार ४६३ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यात १ कोटी ५८ लाख ६२ हजार २५० रूपयांचा दंड वसूल झाला. त्या तुलनेत यंदाची कारवाई कमी असली तरी वर्ष संपायला दीड महिना बाकी असल्याने त्यात अजून वाढ होईल.

आता अल्पवयीन वाहनचालक रडारवर
अनेक अल्पवयीन विद्यार्थी परवाना नसताना वाहन चालवतात. हे प्रकार रोखण्यासाठी मोहिम हाती घेणार आहोत. त्यात सुरुवातीला अल्पवयीन मुलांच्या पालकांना वाहतूक शाखेत बाेलावून समज देऊ. तरीही उपयोग न झाल्यास प्रसंगी कठोर कारवाई होईल. स्वप्निल नाईक, एपीआय, वाहतूक शाखा, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...