आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:मालोद, परसाडे ग्रा.पं.च्या मतदार याद्या; 24 हरकती ; सुनावणी झाल्यानंतर होणार अंतिम प्रसिद्धी

यावल11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मालोद व परसाडे ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीवर दिलेल्या मुदतीत २४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. परसाडे ग्रामपंचायत व मालोद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. नुकतीच त्यासाठी दोन्ही ग्रा.पं.च्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. परसाडे येथे प्रभाग क्रमांक १, २ व ३ मध्ये शब्बीर तडवी, जहांबाज तडवी, फिरोज तडवी, राजू तडवी व युनूस तडवी या पाच जणांनी २३ हरकती घेतल्या आहेत. तर मालोद ग्रामपंचायतीत जावेद सिकंदर तडवी याने प्रभाग क्रमांक २ मध्ये एक हरकत घेतली आहे. दोन्ही ग्रामपंचायतीत प्रारूप मतदार याद्यांवर मिळून तब्बल २४ हरकती घेण्यात आल्या.

शनिवारी तहसील कार्यालयात निवडणूक विभागाचे सुयोग पाटील, सूरज जाधव यांच्याकडे तलाठी समीर तडवी, टी.सी. बारेला यांनी सादर केल्या. लवकरच या हरकतींवर सुनावणी होऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...