आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:5 तालुक्यांत 35 लोकनियुक्त सरपंच पदासाठी आज मतदान; 20 ला निकाल

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विभागातील पाच तालुक्यांतील ३५ गावांमध्ये रविवारी लोकनियुक्त सरपंच पदासाठी मतदान होईल. त्यात भुसावळ तालुक्यातील तळवेल, पिंपळगाव खुर्द, ओझरखेडा, कन्हाळे बुद्रुक, कन्हाळे खुर्द, मोंढाळा गावांचा समावेश आहे. तेथे सरपंच पदाच्या ६ जागांसाठी २३, तर सदस्यांच्या ५२ जागांसाठी ११४ उमेदवार रिंगणात आहेत. या प्रक्रियेसाठी शनिवारी दुपारी १ वाजता २२ केंद्रांसाठी नेमलेले १३२ कर्मचारी साहित्य घेऊन केंद्रांवर रवाना झाले. एकुण ११ हजार ९६४ मतदार या सहा गावांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील. ६ निवडणूक निर्णय अधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असतील. शिवाय १८ टीम राखीव असतील.

शनिवारी सकाळी ११ वाजता सर्वप्रथम तहसील कार्यालयात निवडणूक कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. त्यानंतर १२.३० वाजला गोडाऊनमधून बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट बाहेर काढून दुपारी १ वाजता प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय टेबलवर ठेवण्यात आले. संबंधित मतदान केंद्रांच्या प्रोसिडिंग अधिकाऱ्यांकडे हे साहित्य सोपवण्यात आले.

तहसीलदार दीपक धिवरे, नायब तहसीलदार शोभा घुले, भगवान शिरसाट, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे उपस्थित होते. नंतर दुपारी २.४५ वाजता ११ वाहनांमधून कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. निवडणुकीसाठी १ डीवायएसपी, १ पाेलिस निरीक्षक, ३ एपीआय, ४२ हवालदार, एक आरसीपी प्लाॅटून, १९ हाेमगार्ड, असे एकुण ६८ अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त सांभाळतील.

बोदवडमध्ये ४ गावे... तालुक्यातील वडजी, कोल्हाडी, चिंचखेड, निमखेड, धोंडखेडा येथील निवडणूक लागली आहे. पैकी वडजी येथील सरपंच निवड बिनविरोध झाली. आता उर्वरित ४ गावांमध्ये सरपंच पदाचे १८ व सदस्य पदाचे ३८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी शनिवारी मतदान होईल.

मुक्ताईनगरात गावे २, चुरस मात्र प्रचंड
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा व कुऱ्हा या दोन ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. उचंदा येथील सरपंच पदासाठी ३ उमेदवार आहेत. तर कुऱ्हा येथील सरपंच पदाची चौरंगी लढत आहे. जिल्हास्तरीय नेत्यांच्या सभेमुळे येथील निवडणूक चुरशीची होत आहे.

यावलमध्ये ७ गावे...तालुक्यातील चिखली बुद्रुक, कासारखेडा, न्हावी, चुंचाळे, पिळोदा बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोडचा या ८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. पैकी पिळोदा बुद्रुक येथे सरपंच अविरोध ठरले. आता ७ सरपंच पदाचे २८, तर ५२ सदस्य पदासाठी १३६ उमेदवार आहे.

कन्हाळे खुर्दत कमी मतदार
भुसावळात आेझरखेडा १,७९२, तळवेल ४,८८४, माेंढाळा १,१५२, पिंपळगाव खुर्द १,५५१, कन्हाळे बुद्रूक १,९२८, कन्हाळे खुर्द ६९९ असे मतदार आहे. निवडणूक होणाऱ्या सर्व ६ ग्रामपंचायती मिळून ६,२५२ पुरूष व ५,७१२ महिला असे एकुण ११,९६४ मतदार आपला हक्क बजावतील.

रावेर तालुक्यात ऐन हिवाळ्यात आखाडा तापला
तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी दोधे, निंभोरासिम, धुरखेडा, अटवाडा सरपंच अविरोध झाले. तर सिंगतला अर्ज नव्हता. आता उर्वरित गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी ५७, तर ९९ सदस्य पदांसाठी ३५१ उमेदवार रिंगणात आहेत.

बातम्या आणखी आहेत...