आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राेपांचे याेग्य संगोपन करणाऱ्यांना पुढील वर्षी देणार वृक्षमित्र पुरस्कार;अंतर्नाद प्रतिष्ठानने नागरिकांना वाटली १५० रोपे

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानने वृक्ष लागवड व संगोपनाच्या हेतूने १५० वृक्ष वितरणाचा उपक्रम राबवला. त्यात सहभागी होऊन योग्य पद्धतीने झाडांचे संवर्धन करणाऱ्या नागरिकांना पुढील वर्षी ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अभियानात लावलेल्या झाडांची दर तीन महिन्यांनी किती वाढ झाली? ट्री गार्ड किंवा काटेरी कुंपण केले आहे का? अशी माहिती घेण्यात येईल.

पर्यावरण संवर्धनात हातभार लागावा या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठानने वृक्षलागवड व संवर्धनाची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पर्यावरण प्रेमींना १५० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. बुधवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना वड, पिंपळ, कडूनिंब, चिंच, बहाळ, उंबर, करंज, शिसम या देशी प्रजातीच्या झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात सहभागी झालेल्यांची नावे, गाव, मोबाइल क्रमांक, रहिवासी पत्ता अशी माहिती प्रतिष्ठानतर्फे विहित नमुन्यात भरून घेण्यात आली. या वृक्षांचे योग्य पद्धतीने संगोपन करुन ते जगवणाऱ्यांना पुढील वर्षी प्रतिष्ठानतर्फे वृक्षमित्र पुरस्कार देण्यात येईल. यासाठी अंतर्नादचे पदाधिकारी व सहकारी दर तीन महिन्यांनी लागवड केलेल्या वृक्षांबद्दल माहिती घेतील.

अभियानात यांचा सहभाग
वृक्ष दत्तक अभियानात प्रकल्प प्रमुख तेजेंद्र महाजन, अध्यक्ष संदीप पाटील, समन्वयक शैलेंद्र महाजन, मंगेश भावे, ग.संचालक योगेश इंगळे, संजय भटकर, ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, अमित चौधरी, अमितकुमार पाटील, भूषण झोपे, समाधान जाधव, विक्रांत जाधव, देव सरकटे, सचिन पाटील, मोहन चौधरी, अलका भटकर, शांताराम चौधरी, कृष्णा इतवारे, किशोर माचवे, अतुल सोनवणे, सुरेश न्हावकर, शांताराम चौधरी, लीना चौधरी, उमेश फिरके, संजय झोपे यांचा सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...