आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण:पर्यावरण दिनी जंगलात भटकंती; खान्देशातील पर्यावरणप्रेमींनी काश्मिरात टाकल्या निंबोळ्या

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटनासह पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम
येथील पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण दिनी जंगलात भटकंती करत विविध औषधी वनस्पती, झाडांच्या बिया जंगलात फेकून वैविध्यपूर्ण वनसंपदा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच उन्हाळी पर्यटनादरम्यान काश्मीर, लेह, लडाख येथे गेल्यानंतर खान्देशातील कडूनिंबाची झाडे तेथे जगावीत यासाठी, तेथेही निंबोळ्या टाकल्या आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ.जयवंत पटवर्धन, शीतल देशमुख , शैलेश पाटील, उमेश वाल्हे, राजेश वाघ यांनी तालुक्यातील डांगर येथील जंगलात भटकंती करत वर्षभर गोळा केलेल्या चिंचोक्या, निंबोळ्या, आंब्याच्या कोयी, सीताफळाच्या बिया, बकाम झाडाच्या बिया विविध ठिकाणी टाकल्या.

बातम्या आणखी आहेत...