आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलशुद्धीकरण‎ यंत्रणा:पाणीपुरवठ्याचे रोटेशन‎ 12 तासांनी पुढे लोटले‎ ; संपादरम्यान वीजपुरवठा खंडितचा परिणाम‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीज कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान‎ शहरातील खेडी १३२ केव्ही‎ उपकेंद्रातून तापी नगर ३३ बाय ११‎ केव्ही उपकेंद्राला पुरवठा करणाऱ्या‎ ३२ केव्ही वाहिनीवर बिघाड झाला.‎ यामुळे उत्तर भागातील वीजपुरवठा‎ तब्बल साडेतीन तास खंडित होता.‎ परिणामी पालिकेची जलशुद्धीकरण‎ यंत्रणा बंद पडली. यामुळे शहरातील‎ दक्षिण भागातील पाणीपुरवठ्याच्या‎ रोटेशनवर १२ तासांचा परिणाम‎ होणार आहे. गुरुवारी पाणीपुरवठा‎ होणाऱ्या भागांना ८ तास, तर काही‎ भागांना १२ तास विलंबाने पाणी‎ मिळेल.‎ वीज कर्मचाऱ्यांनी मंगळवारी‎ रात्री पासून संप पुकारला. या‎ दरम्यान बुधवारी दुपारी शहरातील‎ १३२ खेडी सबस्टेशनमधून ३३ बाय‎ ११ केव्ही तापी नगर सबस्टेशनला‎ वीजपुरवठा करणाऱ्या ३२ केव्ही‎ वाहिनीवर बिघाड झाला.

यामुळे‎ शहातील उत्तर भाग व नाहाटा‎ चौफुली सबस्टेशनचा अर्ध्या‎ भागातील वीजपुरवठा साडेतीन तास‎ बंद होता. उत्तर भागातील‎ पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातही‎ बत्ती गूल असल्याने पाणीपुरवठा‎ यंत्रणा ठप्प झाली. यामुळे शहरातील‎ पाणीपुरवठ्याच्या रोटेशनवर १२‎ तासांचा परिणाम होईल. गुरुवारी‎ सायंकाळी शहरातील हनुमाननगर व‎ परिसराला पाणीपुरवठा होणार होता.‎ तो शुक्रवारी सकाळी होईल. गुरुवारी‎ सायंकाळी पाणीपुरवठा होणाऱ्या‎ डायमंड कॉलनी, एकता नगर,‎ पत्रेवाले गल्ली या भागांना गुरुवारी‎ सायंकाळी पाणीपुरवठा होणार‎ होता, या भागांना शुक्रवारी सकाळी‎ पाणीपुरवठा होईल.‎

बातम्या आणखी आहेत...