आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:अयोध्यानगर बोगद्यात तुंबणार नाही पाणी, जलवाहिनीची खोली वाढवली

भुसावळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील अयोध्या नगरातून दक्षिण दिशेच्या सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या अंडरपासमध्ये पावसाचे पाणी तुंबते. एमआयडीसीची पाइपलाइन अडसर ठरत असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने २३ सप्टेंबर रोजी शहरातील तज्ज्ञ अभियंता योगेश पाटील यांना सोबत घेऊन पाहणी केली होती. यावेळी पाटील यांनी सूचवलेल्या उपाययोजनांबाबत २४ सप्टेंबरला ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महामार्ग प्राधिकरण व एमआयडीसी विभागाने अडसर ठरणारी पाइपलाइन पाच फुटांनी खाली घेण्याचे काम बुधवारपासून (दि.२३) सुरु केले आहे.

महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांच्या मागणीनुसार अयोध्या नगर भागातून अंडरपास तयार केले गेले. या ठिकाणी बोगद्याची निर्मिती झाली. पण, एमआयडीसीच्या पाइपलाइनचा अडसर व स्थापत्य दोष या कारणाने तेथून पाण्याचा निचरा होत नाही. या भागातील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन केले. तरीही प्रशासन लक्ष देत नव्हते. ‘दिव्य मराठी’ने शहरातील सिव्हिल अभियंता चतुर्भुज कंन्स्ट्रक्शनचे संचालक योगेश पाटील यांना सोबत घेवून २३ सप्टेंबरला पाहणी केली होती. त्यात पाटील यांनी एमआयडीसीची पाइपलाइन खाली दाबणे, बोगद्यातून पाणी निचरा करण्यासाठी गटार करणे, सर्व्हिस रोडवरील पाणी बोगद्यात येऊ नये म्हणून पाण्याचे स्त्रोत बंद करणे अशा उपाययोजना सुचवल्या होत्या. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत एमआयडीसीने आता तब्बल ६० फूट लांबीची पाइपलाइन पाच फुटाने खाली घेण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे बोगद्यात पाणी साचून गैरसोय होणार नाही. परिणामी फेऱ्याने ये-जा टळेल.

प्राधिकरणाची जबाबदारी अडसर ठरणारी पाइपलाइन सध्याच्या लेव्हलपेक्षा पाच फुटांनी खाली करण्याचे काम एमआयडीसी प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम संपल्यावर महामार्ग प्राधिकरणाकडून बोगद्यात गटार बांधणे व पाण्याचा निचरा पूर्वेकडील सर्व्हिस रोडलगत असलेल्या भागात करण्यासाठीचे काम केले जाईल.

आता अडसर दूर होणार महामार्ग विभागाने यापूर्वी दिलेल्या लाइनआऊटनुसार एमआयडीसीने पाइपलाइन टाकली होती. मात्र, नंतर बोगदा प्रस्तावित झाला. आता अडथळा ठरणारी ६० फूट लांबीची पाइपलाइन जमिनीत आणखी पाच फूट खोल टाकणार आहोत. हे काम पंधरवड्यात पूर्ण होईल. बी.यू.पाटील, सहाय्यक अभियंता, एमआयडीसी, जळगाव

बातम्या आणखी आहेत...