आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भव्य मिरवणूक:आम्हीच सेनेचे खरे वैचारिक वारसदार;मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून आम्ही शिवसेनेचे खरे वैचारिक वारसदार आहोत. भाजपसोबत युती केल्यामुळे आमच्या मूळ घरी आल्याचा आनंद आहे असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. कोसगाव येथे विकासकामांच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते.

मंत्री पाटील यांचे गावातील महिलांनी औक्षण केले. यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर झालेल्या कार्यक्रमाला खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल पाटील, विलास चौधरी, डॉ.चंद्रशेखर पाटील, उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, माजी जि.प.सदस्य हर्षल पाटील, रवींद्र पाटील, सविता भालेराव, भरत महाजन, माजी सभापती पल्लवी चौधरी, रेखा बोंडे, चंपालाल पाटील, लक्ष्मी मोरे, विजय मोरे, सविता भालेराव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...