आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानोसा:आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच, पक्ष उभारी घेणार

भुसावळ4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जळगावल जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, लता सोनवणे, चंद्रकांत पाटील हे शिंदेना जावून मिळाले. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. तर काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेत स्थिती निवळेल अशी भूमिका घेतली.

जिल्हा प्रमुख, महानगरप्रमुख कुणाकडे?

मी शिवसेनेसोबतच, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका वैयक्तिक

सध्या शिवसेनेमध्ये शिंदे गटाने जे बंड पुकारले आहे ते अयोग्य आहे. त्या ऐवजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग निघाला असता. शिंदे गटाला आमिष दाखवून आज जे चित्र निर्माण केले आहे त्यामागे भाजपची खेळी आहे. हिंदुत्व हा मुद्दा शिवसेनेचा प्रमुख विषय आहे तो शिवसेनेने सोडलेला नसल्याने मी शिवसेनेसोबतच आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेली भूमिका ही विधानसभा सदस्य संदर्भात असल्याने तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. गुलाबराव वाघ, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच राहू आम्ही कट्टर शिवसैनिक होतो व पुढेही राहू. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबतच राहणार आहोत. शिवसैनिक केवळ आदेश पाळतो, मी तर पक्षाचा जिल्हाप्रमुख अर्थात पदाधिकारी आहे. यामुळे पक्षाचा आदेश नक्कीच पाळेल. समाधान महाजन, जिल्हा प्रमुख, भुसावळ

पक्ष प्रमुखांच्या आदेशास बांधील शिवसेनेत यापूर्वी राणे, भुजबळ, राज ठाकरे यांनीही सेना संपवण्याची भाषा केली पण उलट सेना जोमाने पुढे सरकली. आताही पक्ष प्रमुख जे आदेश देतील, तो मान्य आहे. आम्ही दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत. डॉ. हर्षल माने, जिल्हा प्रमुख शिवसेना, पारोळा

जे घडतय ते धक्कादायक पक्षात फूट पडणे हे मनाला न पटणारे आहे. जे काही घडतय ते धक्कादायक आहे. संघटनेवर मोठा घाला आहे. आजपर्यंत संघटना वाढवणाऱ्यांनी पुन्हा चर्चेचे माध्यम निवडणे गरजेचे आहे. यातून सकारात्मक निर्णय होतील. पक्ष टिकेल. विष्णू भंगाळे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

मार्ग निघेल असा विश्वास शिवसेनेतील वाद हे घरातील वाद आहे. अद्याप काेणीही शिवसेना साेडलेली नाही. आजही सर्व शिवसेनेतच आहेत. नाराजी असली तरी ती दूर करण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडीतून नक्की मार्ग निघेल, अशी आशा आहे. जयश्री महाजन, महापौर, जळगाव

आम्ही ठाकरेंसोबतच आम्ही कुठेही जाणार नाहीत. कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. कोणी कुठेही गेले तरी आम्ही जिथे आहाेत तिथेच राहू. कोण कुठे गेले याचा आम्ही विचार करत नाहीत. भविष्यात पक्षाचे काम अधिक जोमाने सुरूच राहील. शरद तायडे, महानगर प्रमुख

बातम्या आणखी आहेत...