आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री संत मुक्ताबाई राम पालखी:शेंदुर्णीत संत मुक्ताबाई राम पालखीचे स्वागत

शेंदुर्णी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील संत मुक्ताबाईंची सर्वात जुनी पालखी असलेल्या जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थान संचालित गादी वारस मंगेश महाराज जोशी हे पालखी सोहळ्याचे प्रमुख असलेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले.

जळगाव येथून १४ जून २०२२ रोजी निघालेली ही पालखी २६ दिवसांनी क्षेत्र पंढरपूर येथे पोहाेचली हाेती. त्या ठिकाणी चार दिवस मुक्काम केल्यानंतर १३ जुलै रोजी पंढरपूर येथून ही पालखी जळगावकडे मार्गस्थ झाली. पुन्हा २६ दिवसांचा पायी प्रवास करत ७ ऑगस्ट रोजी जळगाव येथे ही पालखी पाेहाेचेल. गुरुवारी या पालखीचे शेंदुर्णीत स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...