आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवर खड्डे पडून खडी बाहेर:12 कोटींतील रस्त्यांना मुहूर्त मिळणार कधी?

भुसावळ19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१२ कोटींच्या विशेष रस्ता अनुदानातून अर्धवट कामे राहिलेल्या रस्त्यांना अवकळा आली आहे. दोन, तीन भाग वगळता कुठेही बीबीएम झालेल्या रस्त्यांवर सीलकोट व कारपेटची कामे झाली नाहीत. पावसाळ्यामुळे ब्रेक लागलेल्या या कामांना आता पावसाळा ओसरला तरीही मुहूर्त गवसत नाही. त्यामुळे शासनाचा हा संपूर्ण निधीच खड्ड्यांत गेल्याचे चित्र आहे.पालिकेने दीड वर्षांपूर्वी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरु केले. केवळ खडीचा पहिला थर टाकल्यांनतर (बीबीएम झाल्यावर) उर्वरित सिलकोट व कारपेटचे काम अपूर्ण ठेवले. ही बाब आता नवीन राहिली नाही. मात्र, या बीबीएम झालेल्या या रस्त्यांवर खड्डे पडून खडी बाहेर आली आहे.

या रस्त्यांवरुन चालणे मुश्कील, जनता त्रासली
शहरातील मॉडर्न रोड, बाजारपेठेतील नृसिंह मंदिर रोड, गंगाराम प्लॉट, प्रोफेसर कॉलनी भाग, दीनदयाळनगर प्रभाग २२ मधील सर्व भाग, बद्री प्लॉट भाग, गायत्री शक्तीपीठ भागातील अंतर्गत वस्त्यांमधील रस्त्यांची स्थिती बिकट आहे. पापा नगरातील मुख्य रस्त्यावर काम रखडल्याने चिखल साचला आहे. त्यावरून चालणे वाहनधारक व पादचाऱ्यांना मुश्किल झाले आहे.बाब आता नवीन राहिली नाही. मात्र, या बीबीएम झालेल्या या रस्त्यांवर खड्डे पडून खडी बाहेर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...