आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जळगाव रोडवरील तहसील कार्यालयासमोर पाइपलाइन फुटल्याने रस्त्यावर पुन्हा जीवघेणा खड्डा पडला आहे. या गळतीमधून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. सोमवारी तर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पाण्याचे लोट गेले. याच ठिकाणी वारंवार पाइपलाइन फुटून ही समस्या निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडूनही पालिका डोळेझाक करते.
यापूर्वी याच ठिकाणी अनेकवेळा पाइपलाइन फुटून खड्डा पडण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे अपघात वाढल्याची ओरड होताच हा खड्डा बुजवला गेला. मात्र, आता पुन्हा दोन दिवसांपासून जैसे थे चित्र आहे. उन्हाळ्यातच या पाइपलाइनमधून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. वारंवार तक्रारी असूनही पालिका उपाययोजना करत नाही. प्रशासनाला जणू देणेघेणे नसल्याची चित्र आहे.
कर्मचाऱ्यांना पाहणीसाठी पाठवू
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाहणी करण्यासाठी पाठवू. वारंवार एकाच ठिकाणी पाइपलाइनला गळती का लागते? ती पाइपलाइन पालिकेची आहे की खासगी? ही माहिती घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील. संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.