आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैसे थे स्थिती:बंदी असलेल्या कॅरीबॅगचा सर्रास वापर ; 1 जुलैपासून बंदी

भुसावळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने प्लास्टिक एकल वापराच्या वस्तूंवर १ जुलैपासून बंदी लादली. यानंतर पालिकेने २ जुलै रोजी शहरात कारवाई करुन १०० किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या. या कारवाईनंतर काही दिवस प्लास्टिक कॅरीबॅग विक्री व वापर कमी झाला. मात्र, महिना होत नाही तोच जैसे थे स्थिती झाली आहे. या कॅरीबॅग मध्य प्रदेशातून भुसावळात येतात. त्यातून दररोज किमान १५० किलो कॅरिबॅगचा वापर होतो. पालिका शहरात दररोज स्वच्छता करते. मात्र, प्लास्टिक कॅरीबॅगचा प्रचंड वापर होत असल्याने शहराचे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात. एकल प्लास्टिक उत्पादने, वापर, विक्रीवर केंद्राने १ जुलैपासून बंदी घातली. यानंतर पालिकेने २ जुलैला शहरातील कॅरीबॅग विक्रेत्या पाच जणांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. १०० प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या. यानंतर मात्र पालिकेची कारवाई बंद झाली. परिणामी प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर पुन्हा वाढला. दरम्यान, केंद्राने बंदी घातलेल्या वस्तूंमध्ये प्लास्टिक कप, ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, स्टिरर्स, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक अथवा पीव्हीसीपासून बनवलेले बॅनरवर सुद्धा बंदी घातली आहे. या वस्तू शहरात विक्री होतात.

बातम्या आणखी आहेत...