आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:रानभाज्या वाढवतात रोगप्रतिकारशक्ती; जामनेरचे संकेत पाटील यांचे बोदवड महाविद्यालयात प्रतिपादन

बोदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने ग्रो ग्रीन क्लब अंतर्गत २ सप्टेंबरला पावसाळी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. उद््घाटन जामनेर येथील हॉटेल व्यावसायिक संकेत पाटील यांनी केले. रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढवून आरोग्य सुदृढ राखतात. नैसर्गिक वातावरणात उगवलेल्या रानभाज्या अनेक विकारांवर उपयुक्त असतात, असे ते म्हणाले.प्रास्ताविकात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.गीता पाटील यांनी परिसरातील रानभाज्यांची ओळख, गुणधर्म, उपयोग व दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने महोत्सव आयोजित केल्याचे सांगितले. तर प्रमुख पाहुण्या जामनेर महाविद्यालयाच्या गृहशास्त्र विभागाच्या प्रा.मंदा पाटील यांनी रानभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी हितकारक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी रानभाज्याची ओळख व त्यांचे फायदे सांगितले. उपप्राचार्य डॉ.विनोद चौधरी, नारायण अकॅडमीचे संचालक प्रा.अमरीश चौधरी, प्रा.प्रभाकर महाले. डॉ.अजय पाटील, हेमलता कोटेचा, डॉ.ईश्वर म्हसलेकर, प्रा.नितेश सावदेकर, डॉ.रुपेश मोरे, डॉ.अनिल बारी यांच्यासह महोत्सवाला भेट देणाऱ्यांनी पाककृतींची चव घेतली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पाककृतींचे परीक्षण प्रा.मंदा पाटील, संकेत पाटील व डॉ. रत्ना जवरास यांनी बारकाईने केले. सूत्रसंचालन डॉ.वंदना नांदवे, तर आभार संदीप बरडे यांनी मानले.

ऐश्वर्या शेळके प्रथम
महोत्सवात विद्यार्थ्यांनी कुरडू, मायाळू, घोळ, कटुरले, अंबाडी, लाल माठ, तांदुळजा, केना, फांग, अळू, शेवगा इत्यादी भाज्यांपासून बनवलेल्या पाककृती सादर केल्या. परीक्षणाअंती ऐश्वर्या शेळके प्रथम, करिष्मा तेली द्वितीय, तर गोपाल तेली, कोमल लोहार व प्रीती पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

बातम्या आणखी आहेत...