आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह:अनाथाश्रमातील मुलींची माहिती घेणार ; भोरगाव लेवा पंचायतचा विवाहासाठी पुढाकार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लेवा पाटील समाजात विवाहयोग्य मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. यामुळे विवाह जुळवण्यात अडचणी येतात. त्यावर उपाय म्हणून अनाथाश्रमातील उपवर मुलींना दत्तक घेऊन समाजातील मुलांसोबत त्यांचा विवाह लावता येईल का? यासाठी भोरगाव लेवा पंचायतीने पुढाकार घेतला असल्याचे पंचायतीचे पदाधिकारी सुहास चौधरी यांनी सांगितले. सदस्य जून-जुलैत नाशिक, दिंडोरी या भागातील अनाथाश्रमांना भेट देणार आहे. तेथे उपवर मुलींची माहिती संकलित करू. दुसऱ्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर, भंडारा या भागात जातील. भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेत कुटुंब नायक रमेश पाटील, अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, समुपदेशन चेअरमन आरती चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, परीक्षित बऱ्हाटे, महेश फालक, मंगला पाटील, शरद फेगडे, दिगंबर महाजन, रघुनाथ चौधरी यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...