आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाणीपुरवठा मंत्री आणि खासदारांची फलकावर नावे नसल्याने आमदार संजय सावकारे भूमिपूजन न करताच माघारी परतले. हा प्रकार भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथे सोमवारी सायंकाळी घडला. जाडगाव (ता.भुसावळ) येथे जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेतील जलकुंभ उभारण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आणि सोबतच अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती नसल्याने आमदारांनी सुधारित फलक लावावा, अशा सूचना देत भूमिपूजन टाळले.
जाडगाव येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी नियोजित होते. त्यानुसार आमदार भूमिपूजनासाठी पोहोचले. पण, जलकुंभ खोलगट भागात उभारला तर गावाला पूर्ण दाबाने पाणी मिळणार नाही, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे आमदारांनी जलकुंभासाठी उंच जागेची निवड करण्याची सूचना केली. भूमिपूजन फलकावर शिष्टाचाराप्रमाणे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या नावाचा उल्लेख नव्हता.
जागेत बदल करा, नवीन फलक लावा : सावकारे फलकावर शिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री व खासदारांचे नाव नव्हते. जलकुंभाच्या जागेत बदल करावा, नवीन फलक लावावा व संबंंधित अधिकाऱ्यांना भूमिपूजनाबाबत कळवावे, अशा सूचना दिल्याचे आ. संजय सावकारे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.