आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्त्याने पायी चालणाऱ्या विवाहितेच्या गळ्यातून २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र भर दुपारी धूम स्टाइलने लांबवण्यात आले. ही घटना शहरातील महेश नगरातील धन्वंतरी मंदिराजवळ सोमवारी दुपारी २.३० वाजता घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सरला मुकेश ठाकूर (वय ३५, रा.सरस्वती नगर, नंदिनी प्लाझाजवळ, भुसावळ) या सोमवारी (दि.५) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धन्वंतरी मंदिराजवळून पायी जात होत्या. मागून दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे २० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र धूम स्टाइलने हिसकावून पलायन केले. महिलेने आरडाओरड केली. पण, चोरटा पसार झाला. त्याच्या दुचाकीवर क्रमांक नव्हता. महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यावर बाजारपेठ पोलिसांत तक्रार देण्यात आली. साेमवारी रात्री गुन्हा दाखल झाला. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्याचा शोध सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.