आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन:सावित्रीबाईंमुळेच आज महिला सक्षम‎;मानापुरी येथे न्यायाधीश एम.एस.बनचरे यांनी केले मार्गदर्शन‎

यावल‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या सक्षम झालेल्या महिला म्हणजे‎ सावित्रीबाई फुले यांचे महिलांवर‎ असलेले ऋण आहे. एक महिला म्हणून‎ शिक्षण घेताना आपण इतर महिलांना‎ शिक्षण घेऊन सक्षम कसे करू शकतो‎ यासाठी उभे आयुष्य ज्यांनी वाहून दिले,‎ अशा सावित्रीबाईंच्या लेकींनी आज‎ स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे, असे‎ प्रतिपादन यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग‎ न्यायाधीश एम.एस. बनचरे यांनी केले.

ते‎ आदिवासी पाडा मानापुरी येथे आयोजित‎ महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.‎ यावल येथील न्यायालयाच्या विधी‎ सेवा समिती तसेच वकील संघाच्या‎ संयुक्त विद्यमाने आडगाव जवळील‎ मानापुरी येथील आदिवासी पाड्यावर‎ महिला दिनाचा कार्यक्रम झाला. या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्रमात आदिवासी महिलांना‎ कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.‎ तसेच महिलांच्या संदर्भात असलेल्या‎ कायद्यांची माहिती देण्यात आली.‎ न्यायाधीश बनचरे यांनी मार्गदर्शन‎ करताना सावित्रीबाई फुले यांच्या‎ जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सहदिवाणी न्यायधीश व्ही. एस. डांबरे,‎ विधी सेवा समितीच्या सचिव तथा‎ गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री‎ गायकवाड, किशोर सपकाळे, यावल‎ वकील संघाचे अॅड.डी.सी. सावकारे,‎ अॅड. अशोक सुरडकर, गोविंद बारी,‎ अजय कुलकर्णी, विनोद परतणे, याकुब‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तडवी, शेखर तडवी, रितेश बारी, तसेच‎ मानापुरी येथील पोलिस पाटील सरदार‎ बारेला, पिंटू बारेला, चिमा बारेला,‎ सरपंच अमिनाबाई तडवी, कासारखेडा‎ येथील सरपंच अश्विनी पाटील, तसेच‎ सर्व आशा वर्कर यांची उपस्थिती होती.‎ ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.‎

बातम्या आणखी आहेत...