आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्कांसाठी लढा तीव्र:‘महसूल’च्या संपामुळे यावल, मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तहसीलमधील कामकाज ठप्प; वारंवार इशारा देऊनही सरकारने दखल न घेतल्याचा आरोप

यावल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयाचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आपल्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम राहील, अशी भूमिका घेत तहसील कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन सुरू केले. यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले. सोमवारी सकाळी सर्वांनी एकत्र येत तहसील कार्यालयाबाहेर शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून विविध मागण्यांसाठी तहसीलदार महेश पवार यांना निवेदन दिले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे आर.बी.माळी, नायब तहसीलदार भारती भुसावरे, राहुल सोनवणे, मुख्तार तडवी, सुयोग पाटील, सकावत तडवी, दीपक बाविस्कर, मंडळाधिकारी शेखर तडवी, प्रदीप मुंद्रे, लियाकत तडवी, रवींद्र मिस्तरी, भाग्यश्री इंगळे, पी.पी.कांबळे, सूरज जाधव, वाय.डी.पाटील, बाळू पाटील, इनुस खान, सलीम शेख, रामा कोळी, संजय कोळी, रहेमान तडवी यांचा सहभाग होता. या संपामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे झाली नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

बोदवड, मुक्ताईनरात प्रतिसाद
बोदवड । राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर १४ प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या आंदोलनात बोदवड तहसील कार्यालयातील १९ कर्मचारी सहभागी झाले. त्यात सर्व सहाय्यक अव्वल कारकून, वाहन चालक, अधिकारी व शिपाई आदींचा समावेश होता. या आंदोलनामुळे तहसीलच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. तालुकाभरातून आलेल्या नागरिकांना कामे न होताच परत फिरावे लागले.

रावेरात तहसीलमध्ये सामसूम, नागरिकांची गैरसोय
रावेर । महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा रावेर तहसील कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला. नागरिकांना कामे न झाल्याने माघारी परतावे लागले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यानुसार महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर सोनवणे, कार्याध्यक्ष अनिल वानखेडे, सचिव प्रवीण पाटील, भूषण कांबळे, सुलेमान तडवी, इंद्रजीत भारंबे, अजित टोंगळे, सल्लागार निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सचिन पाटील, सदस्य योगेश मोहिते, शिवकुमार, दिलीप पाटील, अतुल सानप, अकबर तडवी, डी.के.पाटील, संजय राठोड, सलीम तडवी, शिपाई संघटन अध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष सत्तार खान, संतोष चौधरी, सुनील सोनार, दिलीप कोळी, यमुना तावडे, लक्ष्मी तुरकुले संपामध्ये सामील झाले.

बातम्या आणखी आहेत...