आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित, तसेच श्रम साफल्य एज्युकेशन संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात, विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय //"डिजिटल इंडिया चे फायदे’ या विषयावर कार्यशाळा झाली. डॉ.संदीप नेरकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सोसायटीचे संचालक अभिजीत भांडारकर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन व माल्यार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक प्रा.डॉ.जगदीश सोनवणे यांनी केले. उद्घाटक डॉ. संदीप नेरकर यांनी विचार मांडले. प्राचार्य डॉ.पी.एस.पाटील यांनी डिजिटल इंडिया चे फायदे सांगितले.
अभिजीत भंडारकर यांनी आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन वाढत असून त्याचा उपयोग या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार आहे, असे सांगितले. आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अनिता खेडकर यांनी केले. डॉ.सागराज चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. पी एस पाटील. यांनी विद्यार्थ्यांना या डिजिटल कार्यशाळेच्या भविष्यात उपयोग होईल असे सांगितले. डॉ. अनिता खेडकर व डॉ.जगदीश सोनवणे यांनी नियोजन केले. शेवटी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
७९ विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग तृतीय सत्रात डॉ. योगेश तोरवणे यांनी डिजिटल इंडिया व ग्रामीण विकास या विषयावर मार्गदर्शन केले.यांनी. गटचर्चा माध्यमातून डॉ. श्वेता वैद्य यांनी तृतीय सत्राचे सूत्रसंचालन केले. चोपडा येथीलमहाविद्या लयातील वाणिज्य विभागाचे डॉ.सी.आर.देवरे चौथ्या सत्राचे व्याख्याते होते. या कार्यशाळेचा एकूण ७९ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.