आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावीर व्यायामशाळेने केले होते स्पर्धांचे आयोजन‎:पाचोऱ्यात विविध गटात‎ रंगली कुस्त्यांची दंगल‎

पाचोरा‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महावीर व्यायाम शाळेने शिव‎ जयंतीनिमित्त श्रीराम मंदिराच्या‎ आखाड्यात आयोजित केलेली‎ कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. या‎ दंगलीत राज्यातील कुस्तीपटूंनी‎ हजेरी लावली हाेती.‎ प्रारंभी शहरातील छत्रपती‎ शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब‎ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार‎ अर्पण करून श्रीराम मंदिरापर्यंत‎ कुस्तीपटूंची सवाद्य मिरवणूक‎ काढण्यात आली. आखाड्याजवळ‎ नीळकंठ महाराज, अण्णा महाराज‎ यांच्या हस्ते हनुमान चालीसा पठाण‎ करुन पूजन करण्यात आले.‎ नगरसेवक सतीश चेडे यांच्या हस्ते‎ आखाडा पूजन करून कुस्त्यांच्या‎ दंगलीस प्रारंभ झाला.

या वेळी‎ आमदार किशोर पाटील, माजी‎ आमदार दिलीप वाघ, शिवजयंती‎ उत्सव समितीचे अध्यक्ष संजय‎ वाघ, उद्योजक मुकुंद बिल्दीकर,‎ संदीप पाटील, सतीश चेडे, माजी‎ नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे‎ सहकार्य लाभले. कुस्तीगीर संघाचे‎ अध्यक्ष प्रा. मालोजीराव भोसले,‎ कैलास आमले, सुनील पाटील,‎ गोकुळ पाटील, बबन पाटील, संजय‎ गोसावी, सुधीर पाटील, गजानन‎ जोशी, दिनेश पाटील, प्रा. सी. एन.‎ चौधरी, अनिल येवले, वैभव‎ पाटील, गंपा पहिलवान, संदीप‎ मराठे, मयूर शेलार, जगदिश शेलार,‎ नारायण जगताप आदींची उपस्थिती‎ होती.

भाजपचे अमोल शिंदे, उद्धव‎ ठाकरे शिवसेना गटाच्या वैशाली‎ सूर्यवंशी, गौरव वाघ, भरत महाराज‎ आदींनी भेट देऊन कुस्तीपटूंचा‎ सत्कार केला. पंच म्हणून कैलास‎ आमले, गोकुळ पाटील, सुनील‎ पाटील, जमील बागवान, राजेंद्र‎ पाटील, तात्या नागणे, दिनेश पाटील‎ यांनी काम पाहिले. प्रा. राकेश‎ सोनवणे यांनी प्रास्ताविक व‎ सूत्रसंचालन तर राजेंद्र पाटील यांनी‎ आभार मानले. श्रीराम मंदिर‎ परिसरात असलेल्या आखाड्यात‎ आयाेजित कुस्ती स्पर्धा‎ पाहण्यासाठी शहर व तालुक्यातील‎ नागरिकांची उपस्थिती हाेती.‎

बातम्या आणखी आहेत...