आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:विधान परिषद निवडणूक विजयाचा यावल शहर भाजपकडून जल्लोष

यावल4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने पाच जागा जिंकल्याबद्दल शहरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करून विजयाचा जल्लोष केला.

राज्यभर गाजलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. यावल शहर व तालुका भाजपच्या वतीने शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या पक्षाच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मंगळवारी एकत्र आले आणि विजयाचा जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. या प्रसंगी भाजप किसान मोर्चाचे नारायण चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, बाळू फेगडे, विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष डॉ.नीलेश गडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा वड्रीचे सरपंच अजय भालेराव, राकेश फेगडे, अतुल भालेराव, व्यंकटेश बारी, भूषण फेगडे, विजय मोरे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, मनोज बारी, सागर लोहार, नरेंद्र नेवे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, पी.एस. सोनवणे, परेश नाईक, योगेश चौधरी, भरत धनगर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...