आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकांची आरक्षण सोडत:यावलला प्रा.मुकेश येवले यांना शोधावा लागेल नवा प्रभाग

यावल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावलला ११ प्रभागातील २३ जागांसाठीचे आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जाती व जमातीला प्रत्येकी दोन जागा आणि सर्वसाधारण १९ मधील १० जागांवर महिलांचे आरक्षण निघाले. एसटीची एक जागा वाढून प्रथमच दोन जागा झाल्या. तर माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांचा प्रभाग ११ एसटी व महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची कोंडी झाली.

आरक्षण सोडत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, तर सहकारी म्हणून मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी काम पाहिले. सुरूवातीला अनुसूचित जातीच्या आरक्षित प्रभाग क्रमांक २ व ५ मध्ये आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षित प्रभाग क्रमांक ३ आणि ११ मध्ये लहान मुलांच्या हातून चिठ्ठी टाकून महिलांचे आरक्षण काढण्यात आहे. इतर प्रभागाचे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काढले. ११ प्रभागातील २३ जागांपैकी १२ जागा महिलांसाठी राखीव असून प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती व जमातीच्या महिलेसाठी तर ११ जागा सर्वसाधारण आहेत. सोडतीसाठी कक्ष अधीक्षक राजेंद्र गायकवाड, स्थापत्य अभियंता योगेश मदने, एस.ए.शेख यांनी सहकार्य केले. या सोडतीवर १५ ते २१ जूनपर्यंत हरकती घेता येतील, असे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...