आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:यावलला वादळाचा तडाखा; केळीचे नुकसान, नावरेत ढगफुटीसदृश पाऊस

यावलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यावर मुसळधार पाऊस झाला. यामुळे केळीचे नुकसान झाले. शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली. खांब कोसळून तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित होता. नावरे परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने शेतीचे बांध व मातीदेखील वाहून गेली.

यावल शहर व तालुक्यात गुरुवारी दुपारी तीन वाजेनंतर वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी वादळ सदृश स्थिती होती. या वादळात अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली. यावल, दहिगाव, सावखेडासीम, साकळी, चुंचाळे, बोराळे व नावरे शिवारात कापणी योग्य झालेली केळी जमीनदोस्त होत शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावल शहरात आणि परिसरातील झाडे, विजेचे खांब कोसळले. काही ठिकाणी वीज खांब व वीज तारांवर झाडे कोसळून वीज वितरणचे नुकसान होत सुमारे चार तास वीजपुरवठा खंडित होता. प्रामुख्याने नावरे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने रस्ते वाहून गेले.