आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान‎:फैजपुरातील योगेश चौधरी यांचा‎ पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान‎

फैजपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व विशेष‎ सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग‎ कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, ‎जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे, १७‎ रोजी सावखेडा (ता.जळगाव) येथील ‎शानबाग विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ‎जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन‎ झाले.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या‎ दिव्यांग बांधवांचा गौरव पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांनी केला.‎ यावेळी इंडिया बुक ऑफ रेकार्ड होल्डर,‎ तथा दिव्यांग सेनेचे यावल तालुकाध्यक्ष‎ योगेश चौधरी यांना सन्मानपत्राने‎ गौरवण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी‎ प्रवीण महाजन, जि.प.सीईओ डॉ.पंकज ‎आशिया, अतिरिक्त सीईओ बाळा मोहन,‎ शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा‎ समाज कल्याण अधिकारी विजय‎ रायसिंग, दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष‎ अक्षय महाजन, जिल्हा सल्लागार राहुल‎ कोल्हे, गणेश पाटील, पराग वारके, हितेश‎ तायडे, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह‎ मान्यवर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...