आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठ्याचा त्रास वाढला:उत्तर भागात मिळेल सुरळीत वीज

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण व पालिकेच्या सेंट्रल पोलवर केबल नेटवर्किंग व इंटरनेटच्या केबल ११ केव्ही वाहिनाला स्पर्श करत होत्या. यामुळे ऐन गणेशोत्सवात उत्तर भागात खंडित वीजपुरवठ्याचा त्रास वाढला होता. टेक्निकल हायस्कूलजवळील न्यायालय फीडरच्या ११ केव्ही वाहिनीवरील ही तांत्रिक समस्या महावितरणने मंगळवारी सोडवली. यामुळे दुपारी तब्बल ३ तास वीजपुरवठा बंद होता.

शहरातील उत्तर भागातील न्यायालय फीडरवर ऐन गणेशोत्सवातच खंडित वीजपुरवठ्याचा त्रास वाढला होता. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी देखील वारंवार होणारे ब्रेक डाऊन आणि खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारींमुळे हैराण झाले होते. त्यामुळे त्यांनी नेमकी अडचण शोधण्यासाठी पाहणी केली. त्यात टेक्निकल हायस्कूलजवळ ११ केव्ही वाहिनीला पालिकेच्या सेंट्रल पोलवरुन आलेल्या इंटरनेटच्या केबलचा अडथळा होत असल्याचे समोर आले.

यामुळे वारंवार पुरवठा खंडित होत असल्याची बाब समोर आली. यामुळे सहाय्यक अभियंता रवींद्र पद्मे व सहकाऱ्यांनी येथे वीज तारांमध्ये पीव्हीसी पाइप टाकण्याचे काम मंगळवारी दुपारी पूर्ण केले. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी पालिका आणि वीज वितरण कंपनीच्या वीज खांबांवर खासगी केबल नेटवर्किंग व इंटरनेट पुरवठादारांनी सर्रास केबल टाकल्या आहेत. यामुळे दुरुस्तीची कामे करताना वीज कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. आता वीजपुरवठ्यातच व्यत्यय येत असल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...