आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची आत्महत्या:दहिगावच्या तरुणाची पुणे येथील घरात आत्महत्या; त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही

यावलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दहिगाव येथील मूळ रहिवासी २७ वर्षीय तरुणाने पुणे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. पुष्कर नंदकुमार महाजन असे मृताचे नाव आहे.

दहिगाव येथील पुष्कर महाजन हा विवाहित तरूण गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे एका कंपनीत नोकरीस होता. पत्नी व दोन वर्षीय मुलीसह तो पुण्यात राहात होता.

त्याने ९ एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पुणे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती तळेगाव (पुणे) पोलिसांना देण्यात आली. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. टीनू महाजन याच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली.