आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पटेल वाडा भागातील रहिवासी २३ वर्षीय तरुणावर एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून शुक्रवारी पहाटेपूर्वी चाकू हल्ला झाला. त्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर तिघे फैजपूर शहरातील असल्याचे तरुणाने सांगितले. तर पोलिसांनी जळगावला जिल्हा रुग्णालयात जावून तरुणाचा जबाब घेतला. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला. जावेद युनूस पटेल असे हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
जावेद पटेल या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेसोबत य त्याचे अनैतिक संबंध होते. या संबंधातून त्याचे गुरुवारी वाद झाले आणि सदर महिलेने मध्यरात्रीनंतर दोन वाजता जावेदला कॉल करून घराबाहेर बोलवले. घराबाहेर उभ्या फैजपूर येथील मुज्जू डॉन, गुड्डू डॉन आणि सोनू (पूर्ण नावे माहीत नाही) या तिघांनी त्यास दुचाकीवर बसवून भुसावळ रस्त्यावर असलेल्या घोडे पीर बाबा दर्ग्याजवळ आणले. तेथे त्याच्यात वाद झाला. तिघांनी जावेद पटेल याच्यावर चाकूने सपासप वार करत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यावरील वाहतुकीमुळे या तिघांनी पळ काढला.
जखमी झालेल्या जावेदने नातेवाइकांना माहिती दिली. त्याच्यावर तातडीने रात्रीच ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमी जावेद याचा जबाब घेण्यासाठी यावल पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक आशित कांबळे व पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर जळगावला गेले होते. दरम्यान या प्रकरणी गंभीर जखमी जावेद याच्या जबाबावरून यावल पोलिसांत तिघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. तपास स्वत: परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक आशित कांबळे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.