आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक सूर्य दिन विशेष:झोनल ट्रेनिंग सेंटर सौर ऊर्जेवर, वर्षभरात 50 लाखांच्या वीज बिलात बचत; प्रकल्पासाठी 3 कोटी 70 लाख खर्च, कार्यालयांसह निवासस्थानांच्या विजेची गरज भागतेय सौरऊर्जेवर

भुसावळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ होत आहे. मात्र, देशात ऊर्जानिर्मितीची जेमतेम स्थिती पाहता रेल्वे मंत्रालयाने जास्तीत जास्त कामकाज सौरऊर्जेवर नेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सहा वर्षांपासून भुसावळातील रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये (झेडआरटीआय) सौर ऊर्जेचा वापर सुरू आहे. यामुळे दरवर्षी विजबिलावर खर्च होणाऱ्या ५० लाख रुपयांची बचत होते. भुसावळातील हा प्रयोग यशस्वी झाल्याने रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेतील पाचही विभागांना ५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती व वापराचे उद्दिष्ट दिले आहे.

झेडआरटीआयमध्ये दरमहा सरासरी ५ लाख रुपये वीज बिल येत होते. या विजेची बचत करून संपूर्ण कामकाज सौरऊर्जेवर चालवण्याची संकल्पना २०१६मध्ये पुढे आली. त्यातूनच केंद्राच्या छतावर १९८२ सौरप्लेट बसवून ५०० केडब्ल्यूपी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला. या सौरऊर्जेतून प्रशासकीय इमारतीसह सात वसतिगृह, खानावळ, पंधरा बंगला कर्मचारी कॉलनी, रेल्वे कॉलनी, वातानुकूलीत यंत्रणा, १०० कुलर, संस्थेतील पंखे, दिवे, वॉटर गिझर चालवले जातात.

बातम्या आणखी आहेत...