आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गोद्री येथे २५ ते ३० जानेवारीदरम्यान होत असलेल्या महाकुंभाच्या नियोजित जागेचे, बुधवारी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १०० बसेस आरक्षित केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जानेवारीत गोद्री येथे बंजारा, लभाना नायकडा समाजाचा महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील संत महंतांसह समाजबांधव, सात राज्यांचे मुख्यमंत्री, संघाचे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत. महाकुंभाच्या काळात दररोज सुमारे दोन ते अडीच लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे भाविकांसाठी निवासापासून ते महाप्रसादापर्यंतची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या मान्यवरांच्या हेलिकॉप्टरसाठी गोद्री येथे चार व फत्तेपूर येथे दोन हेलिपॅड उभारण्याचे नियोजन आहे. त्यासोबतच भाविकांना फर्दापूर, जामनेर, वाघजाळ फाटा, बोदवड, भुसावळ अशा विविध ठिकाणाहून येण्यासाठी दररोज शंभर बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.
यांनी केली पाहणी प्रभारी जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रांताधिकारी महेश सुदळकर, तहसीलदार अरूण शेवाळे, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भेगावडे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सा.बां.विभागाचे उपअभियंता आर.डी.पाटील यांनी कार्यक्रम स्थळ, यात्रा, पार्कींग, रस्ते अशा ठिकाणांची पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.