आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्य विजयी:काजीपुरा-हिंगोणा ग्रुप विकासोत दादाजी पॅनलचे 11 सदस्य विजयी ; सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक

चोपडा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काजीपुरा-हिंगोणा ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जय श्री दादाजी पॅनलचे १३ पैकी ११ सदस्य विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीत माजी चेअरमन रवींद्र पवार यांचा पराभव झाला आहे. जय श्री दादाजी पॅनलचे युवराज पाटील यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी दत्तात्रय पाटील, अरूण पाटील, जिजाबराव पाटील आदी विजयी सदस्यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी सरपंच अजबराव पाटील, दीपक पवार, रविराज पाटील, अरुण पाटील, तुळशीराम पाटील, भैय्या पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...