आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:मनपासाठी 11 गावे इच्छुक, मात्र नागेवाडीला अजूनही सुविधा मिळेना

लहू गाढे | जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहराचे महानगरपालिकेत रूपांतर केल्या जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. वाढीव लोकसंख्या व हद्दवाढीमुळे शहराला लागून असलेली काही गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर गावच्या लोकप्रतिनिधींकडे चर्चा केली. खरपुडी, दरेगावचे लोकप्रतिनिधींनी आमच्या गावच्या दोन वर्षांपूर्वीच निवडणुका झाल्या. आमच्या सरपंचांचा कार्यकाळ पूर्ण होऊ द्या असे म्हणत आहेत, तर देवमूर्ती, इंदेवाडीसह ११ गावे महानगरपालिकेत येण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, यापूर्वी १९८३ मध्ये हद्दवाढ होऊन नागेवाडी हे गाव जालना पालिकेत आले. परंतु, अजूनही या गावात असुविधा जशाच्या तशा आहेत. या गावात पाणी नाही, रस्ते नाहीत, अंतर्गत नाल्या नसल्याने खासगी विहिरींच्या पाण्यावरच येथील गावकऱ्यांना तहान भागवावी लागत असल्याने हे गाव शहरी सुविधांपासून वंचित आहे.

जालना महानगरपालिका होण्यासाठी लोकसंख्या कमी पडल्यास जालन्याची हद्दवाढ करून खरपुडी, इंदेवाडी, चौधरीनगर, देवमूर्ती, प्रशांतीनगर, जामवाडी, श्रीकृष्ण गर, पानशेंद्रा, गुंडेवाडी, सिरसवाडी, इंदेवाडी, रोहनवाडी, बेथलम, अंतरवाला, कुंबेफळ, राममूर्ती, निधोना, तांदुळवाडी, दरेगाव, दावलवाडी आदी गावे घेऊन महानगरपालिका करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी इंदेवाडी, देवमुर्ती, जामवाडी, श्रीकृष्ण नगर, पानशेंद्रा, गुंडेवाडी, सिरसवाडी, इंदेवाडी, रोहणवाडी, बेथलम, कुंबेफळ, दरेगाव ही गावे ११ महापालिकेत येण्यास इच्छुक आहेत. नगररचना विभागाने घोषित केलेल्या झालर क्षेत्रातील १९ गावांचा यात समावेश होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली. इंदेवाडी गावाला लागून शहराचा बहुतांश भाग आहे. गावचा विकास होण्यासाठी महानगरपालिका महत्त्वाची ठरणार आहे.

४२ वर्षे उलटूनही गावचा विकास नाही
देवमूर्ती गावात ४२ वर्षे उलटूनही गावात सुविधा नाहीत. रस्ते, नाली, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा नसल्यामुळे गाव महानगरपालिकेत जात असल्यास आनंदच आहे. प्रशांतीनगर, चौधरीनगर या भागातील ९० टक्के लोकसंख्या ही शहरातीलच आहे. यामुळे महानगरपालिका व्हावी. - नम्रता शंकर तपसे, ग्रा. पं. सदस्य, देवमूर्ती.

सरपंचपदाचा कार्यकाळ संपू द्या
आमच्या गावच्या सरपंचपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आमचे गाव महानगरपालिकेत घ्यावे. निवडणुका होऊन दोनच वर्षे उलटली आहेत. आमचे गाव महापालिकेत घेण्यास इच्छुक आहोत. मात्र, कार्यकाळ पूर्ण होऊ द्यावा. विरोधासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहारही करणार आहे.- अरुण गिरी, सरपंच, खरपुडी, ता. जालना.

मनपा होणे एवढे सहज सोपे नाही
महापालिका होण्यासाठी हद्दवाढ, ग्रामपंचायतींचे ठराव, लोकसंख्येचे निकष, क्षेत्रफळ या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. एवढ्या सहज महापालिका होणे सोपे नाही. गावांचा विरोध असल्यास संविधानिक मार्गाने त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. यामुळे या बाबी लांबणीवर पडू शकतात. - धर्मा खिल्लारे, माजी प्रशासकीय अधिकारी, न.प.,जालना.

बातम्या आणखी आहेत...