आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक सूर्य दिन विशेष:चाळीसगावात 117 संस्था, घरांमध्ये 895 केव्ही क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प, महिनाभरात 90 हजार युनिट वीजनिर्मिती; कार्यालयांसह निवासस्थानांची विजेची गरज भागतेय सौरऊर्जेवर

चाळीसगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या वीजबिलांमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे बिलांच्या आर्थिक भुर्दंडापासून आता कायमची मुक्ती मिळवण्यासाठी चाळीसगाव शहरात अपारंपरीक उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. दरमहा हजारो रूपयांचे वीजबील येत होते ते आता सौरउर्जेमुळे शुन्यावर आले आहे. शहरातून ११७ संस्था व नागरिकांनी ८९५ केव्ही क्षमतेचे साैर उर्जा प्रकल्प आपल्या छतावर बसवले आहेत. त्यामुळे त्यांना मोफत वीज मिळत आहे.

सौर उर्जा वापरण्याच्या पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील ११७ संस्था व नागरिकांनी घराच्या आणि दुकानाच्या छतावर एकूण ८९५ केव्ही क्षमतेचे सौरउर्जा प्रकल्प उभारून, आपारंपरिक उर्जेचा वापर केला. गेल्या महिनाभरात यातून एकूण ९० हजार युनिट विजेची निर्मिती झाल्याने त्यांची वीज बिलापासून सुटका झाली आहे. त्यात दूध डेअरी, हॉस्पीटल, महाविद्यालय व उद्योगपती व सामान्य नागरिक यांचा समावेश आहे. या नागरीक, संस्था यांच्याकडे सौर उर्जा प्रकल्प प्रस्थापित करण्यापूर्वी विजेचा वापर होत होता. दर महिन्याला त्याचे वीज बील हजारोंच्या घरात होते.

मात्र त्यांनी नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सौरउर्जा प्रकल्प प्रस्थापित केला. दर महिन्याला ५ हजार ते ५० हजार रूपयांपर्यंत विजबिल येत होते ते वीजबिल सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वीत केल्यामुळे चक्क शून्यावर आले आहे. म्हणजे वर्षाला वीजबिलापोटी अनेकांना लाखो रूपये भरावे लागत होते. त्यांची आता सौरउर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीजबिल भरण्याच्या खर्चातून मुक्तता झाली आहे. पर्यावरण संवर्धानासाठी या घटकांचा हातभार लागल्याने, चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व सौरउर्जा वापरकर्त्यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...